Mahanews
बुधवार, ८ सप्टेंबर, २०१०
फर्स्ट पर्सन
वर्षा पर्यटनासाठी साद घालतोय गगनबावडा .. .
तर मग आपणही ही मजा चाखण्यासाठी गगनबावडय़ाला या... तो आपणाला साद घालत आहे.
दिलखुलास
जय महाराष्ट्र
अनधिकृत शिक्षणसंस्था चालकांना दंड आणि शिक्षा -राजेश टोपे
अनधिकृत शिक्षणसंस्थेद्वारे होणारी विद्यार्थ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र अनधिकृत संस्था प्रतिबंध कायदा तयार केला असून हे विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात मांडले जाणार आहे.
लोकराज्य



राज्याचे शस्त्रास्त्र धोरण सात दिवसात तयार करावे - गृहमंत्री
सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१०

राज्याचे शस्त्रास्त्र धोरण येत्या सात दिवसात तयार करून या धोरणात दहशतवाद प्रतिबंध, नक्षल प्रतिबंध आणि कायदा-सुव्यवस्था या तीन घटकांचा स्वतंत्रपणे विचार करावा, अशी सूचना गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी सोमवारी गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना केली.

गृह विभागाच्या शस्त्रास्त्र धोरणासंदर्भात गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस अपर मुख्य सचिव (गृह) श्रीमती चंद्रा अय्यंगार, प्रधान सचिव पी.के.जैन, पोलीस महासंचालक अनामी रॉय, मुंबईचे पोलीस आयुक्त डी.शिवानंदन, अपर पोलीस महासंचालक श्री.पारसनीस, अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशासन) अंबालाल वर्मा, अपर पोलीस महासंचालक (लोहमार्ग) राज खिलनानी, लोहमार्ग पोलीस आयुक्त टी.ए.चव्हाण, अतिरिक्त पोलीस उपमहानिरीक्षक (नक्षल प्रतिबंधक मोहीम) सुनील रामानंद आदी उपस्थित होते.

श्री.पाटील म्हणाले की, शासनाने शस्त्रास्त्रे व दारूगोळ्यासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला असून मिळालेल्या निधीतून तात्काळ कार्यवाही होणे अपेक्षित आहे. येत्या सात दिवसात राज्याचे शस्त्रास्त्र धोरण तयार करून तातडीने अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. शस्त्रे सुरक्षित ठेवण्यासाठी काळजीपूर्वक नियोजन करून त्यासंदर्भात काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्यात येतील, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.

संवेदनशील तुरूंगांचे सर्वेक्षण करून गरजेनुसार त्यांना स्वयंचलित रायफल (एसएलआर) उपलब्ध करून देण्याचे आदेशही गृहमंत्री श्री.पाटील यांनी यावेळी दिले. वित्त विभाग सुरक्षेसाठी लागणारा निधी प्राधान्याने देत असून मिळालेला संपूर्ण निधी नियोजनबद्धरितीने खर्च करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पोलिसांना जाहीर केलेली बक्षिसे आणि आहार भत्ते वेळेवर देणे आपली जबाबदारी आहे, असे सांगून थकीत आहार भत्ते तात्काळ वाटप करण्याचे निर्देशही गृहमंत्र्यांनी दिले.

'महान्यूज'मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
ई बातमी
Copyright DGIPR and Government of Maharashtra About Us  |  Team  |  Contact us  |  Feedback  |  Terms of use |  Hacking Notification
Site is best viewed with IE 6.0 or higher and min. screen resolution of 1024x768 Developed by OneUpDesigns
A Yass Multimedia Project
Total visits : 3219687